FFJ हे एक मानवनिर्मित मध आहे. हे एक उत्तम संजीवक असून नैसर्गिक शेतीमधे वापरले जाणारे प्रभावी एंझाइम आहे. ज्यामधे केवळ फळांचा मुख्य घटक म्...
FFJ हे एक मानवनिर्मित मध आहे. हे एक उत्तम संजीवक असून नैसर्गिक
शेतीमधे वापरले जाणारे प्रभावी एंझाइम आहे. ज्यामधे केवळ फळांचा मुख्य घटक
म्ह्णून वापर केला जातो. पिकांना पुनर्जीवित करण्यासाठी ,पशुधनाच्या उत्तम
वाढीसाठी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही याचा वापर होऊ शकतो.
FFJ बनविण्यासाठी केळी, पपई, आंबा, टरबूज आणि सफरचंद या फळांचा वापर करू शकतो. फळे गोड असावीत.
साहित्य
पिकलेली गोड फळे.
गुळ
द्रावण बनविण्यासाठी पात्र (किती प्रमाणात बनवणार आहात त्यानुसार योग्य आकाराचे).
लाकडी काठी (द्रावण ढवळण्यासाठी)
स्वच्छ सछिद्र कापड किंवा कागद (पात्राच्या तोंडावर झाकण्यासाठी).
कसे बनवावे
फळे निवडताना चांगली पिकलेली फळे घ्या. फळे स्थानिक असतील तर उत्तमच. जर फळांची संख्या कमी असेल तर त्यात भर म्हणून पालक भाजीचे देठ, रताळू, काकडी, तुरई, गोभी हे देखील वापरू शकता. द्राक्षापासून बनविलेले एंझाईम हे केवळ द्राक्ष पिकासाठी व लिंबुवर्गीय फळांपासून बनविलेले एंझाईम हे फक्त लिंबुवर्गीय फळांसाठीच वापरावे. ही फळे आपल्या विशीष्ट गुणधर्मांमुळे इतर पिकांसाठी तितकीशी लाभदायक नाहीत. फणसाचा वापर एंझाईमसाठी अजिबात करू नये
जेवढ्या वजनाची फळे घ्याल तेवढ्याच वजनाचा गुळ घ्यावा. द्रावण जर हिवाळ्यात बनविणार असाल तर १ किलो फळांसाठी १.२५ किलो या प्रमाणात गुळ घ्यावा. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने आर्द्रता नियमन करणे जरूरी आहे.
द्रावणासाठी वापरण्याचे पात्र स्वच्छ धुऊन उन्हात वाळवा
स्वच्छ पृष्ठभागावर निम्मे गुळ कुस्करून पसरवा. त्यात फळांचे छोटे छोटे काप करून टाका. दोन्ही पदार्थांना व्यवस्थित मिसळा व पात्रात टाका. त्यावर उरलेला निम्मा गुळ कुस्करून पसरवा.
लाकडी काडी अथवा काठीने द्रावण हळुवार दोन ते तीन वेळा ढवळून घ्या.
पात्राचे तोंड स्वच्छ कागदाने अथवा कापडाने झाकून दोऱ्याने अथवा रबर बॅंडच्या साह्याने बांधा. कापड व कागद सछिद्र असल्याने द्रावणास हवेचा पुरवठा व्यवस्थित होतो व झाकल्याने जंतू व कीटकांपासून होणारा संसर्ग टळतो. द्रावण सावलीच्या ठिकाणी ठेवा.
उन्हाळ्यात द्रावणाची किण्वन प्रक्रिया ४ ते ५ दिवसात तर हिवाळ्यात ७ ते ८ दिवसात पूर्ण होते. त्यानंतर हे द्रावण कापडाने गाळून वापरण्यास तयार आहे.
एंझाईममधील सुक्ष्मद्रव्ये पिकांच्या वाढीतील विविध अवस्थांमधे अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहेत. या अवस्थांमधील फॉस्फरीक ऍसीड व कॅल्शीयमची गरज एंझाईममुळे पूर्ण होते.
कसे व किती वापरावे
पिकांवर फवारणीसाठी व बीजप्रक्रियेसाठी १ लिटर पाण्यात १ मि.लि. एंझाईम
पिकांना जमीनीतून किंवा ड्रीपमधून पाण्याद्वारे देण्यासाठी १ लिटर पाण्यात ५ मि.लि. एंझाईम
याव्यतिरीक्त गुरांच्या गोठ्यात, कोंबड्यांच्या खुराड्यात जंतूनाशक म्हणून १ लिटर पाण्यात १ मि.लि. एंझाईम
या प्रमाणात वापरून फवारता येते.
घरातील फरश्या पुसण्यासाठी पाण्याबरोबर आपण फ़िनाईल जितक्या प्रमाणात घेता त्याऐवजी तितकेच एंझाईम पाण्यात घेतल्यास उत्कृष्ट जंतुनाशक आहे.
फेसवॉश साठी १ लिटर पाण्यात १ मि.लि. एंझाईम टाकून वापरल्यास त्वचा तजेलदार होते.

COMMENTS