दैनंदिन वापरातील ताज्या फळांच्या साली, उरलेले तुकडे, भाजीपाल्यांचे देठ, गुळ व पाणी यांच्या किण्वन प्रक्रियेतून तयार केलेले हे एक सेंद्रीय द...
दैनंदिन वापरातील ताज्या फळांच्या साली, उरलेले तुकडे, भाजीपाल्यांचे देठ, गुळ व पाणी यांच्या किण्वन प्रक्रियेतून तयार केलेले हे एक सेंद्रीय द्रावण आहे. या किण्वनाद्वारे प्रथिने, क्षार व एंझाइम यांची एक नैसर्गिक साखळी तयार होते. जैविक विभाजन, बदल व उत्प्रेरक क्रिया घडविण्याचे विशेष सामर्थ्य या द्रावणात आहे, ज्याचे अतिउत्तम परीणाम मिळतात.
एंझाइम संशोधनात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी संशोधन करणाऱ्या थायलंड स्थित डॉ. रोसुकन (Rosukon) या महिला शास्त्रज्ञाने गारबेज एंझाइम विकसित केले आहे. त्यांच्या मते गारबेज एंझाइम बनवणे व वापरण्याने ग्लोबल वार्मिंग कमी होण्यास मदत होऊ शकते.
साहित्य
१ किलो गुळ
३ किलो गारबेज (जैविक कचरा)
यामधे सफरचंद, संत्रा, अननस, नाशपाती, टरबूज, द्राक्षे, लिंबू, पेरू यांच्या साली व उरलेले तुकडे किंवा पालेभाज्यांचे उरलेले देठ यांचा वापर करू शकता. फणस व मांस (मटन) अजिबात वापरू नये.
१० लिटर पाणी
वरील सर्व साहित्य एकत्र करून मावेल इतक्या आकाराचा प्लास्टिकचा हवाबंद झाकण असलेला ड्रम घ्यावा.
सर्व साहित्य प्लास्टिकच्या ड्रममधे एकत्र मिसळा व ड्रमचे झाकण घट्ट लावा. सावलीच्या ठिकाणी सामान्य तापमानात ठेवा. पहिल्या ३० दिवसात दररोज एकदा ड्रमचे झाकण उघडून तयार होणारे गॅस बाहेर निघू द्या. नंतरच्या दिवसात गरज असेल तरच झाकण उघडून गॅस बाहेर जाऊ द्या.
किण्वन प्रक्रियेदरम्यान द्रावणाच्या पृष्ठभागावर कदाचित पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर जमा झालेला दिसेल किंवा अळ्या तयार झालेल्या दिसतील. यात काळजीचे कारण नाही. अशावेळेस मूठभर गुळ द्रावणात मिसळा व द्रावण काडीने व्यवस्थित ढवळून झाकण पुन: घट्ट लावा. अळ्या व बुरशी एका रात्रीत नष्ट झालेल्या दिसतील.
किण्वन प्रक्रिया पूर्ण होण्यास ३ महिन्यांचा कालावधी लागतो.
या कालावधीनंतर द्रावण गाळून त्यातील चोथा अलग करा. गाळल्यानंतर तयार झालेले गारबेज एंझाइम वापरण्यासाठी तयार आहे. या एंझाइमची वैधता अमर्याद आहे. जितके जुने तितके उत्तम.
द्रावण तयार करून उरलेला चोथा पुन: नवीन द्रावण तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. किंवा त्यास वाळवून, भुगा करून खत म्हणून वापरता येतो.
गारबेज एंझाइमचे अनेक उपयोग
वातावरण शुद्धीकरण : एंझाइम तयार होत असताना त्याद्वारे वातावरणात ओझोन वायू मुक्त होतो. त्यामुळे परीसरातील वातावरणात विषाणुंचा नायनाट होऊन ऑक्सीजनचा स्तर उंचावण्यास मदत होते.
पाण्यात मिसळून हवेत फवारल्यास हवेतील दुर्गंधी नष्ट होते.
घरगुती साफसफाई : फरशी पुसण्यासाठी बादलीभर पाण्यात २ चमचे एंझाइम टाकून वापरल्यास निर्जंतुक सफाई मिळेल.
टॉयलेट सफाई : पाण्यात न मिसळता टॉयलेट धुण्यासाठी वापरावे. अपायकारक किटाणूंचा नाश होतो. चिकट डाग निघुन जातात. मुंग्या व झुरळे पिटाळून लावली जातात.
भाजीपाला निर्जंतुकीकरण : फळे व भाजीपाला धुण्याच्या पाण्यात २ चमचे एंझाइम टाकल्यास त्यावरील किटकनाशकांचे विषारी अंश नष्ट होतात.
कपड्यांची धुलाई : कपडे भिजविण्याच्या पाण्यात अल्प प्रमाणात एंझाइम टाकल्यास कपडे धूण्यासाठी साबण व डिटर्जंट कमी लागतो.
शेती : पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात १ मि.लि. एंझाइम व जमीनीतून पाण्याद्वारे देण्यासाठी १ लिटर पाण्यात ५ मि.लि.एंझाइम वापरावे. पिकांच्या वाढीसाठी व फळांच्या पोषणासाठी याचे परीणाम अप्रतिम व थक्क करणारे आहेत
बिजप्रक्रिया - १ लि. पाणी + ५ मिली गारबेज
फवारणी - १ लि पाणी + १ मिली गारबेज
बेणेप्रक्रिया - १००लिटर पाणी + ३०-५० लिटर गारबेज
मिलीबग साठी - १५लि पाणी + १५०-२०० मिली
गारबेज एंझाईम तयार करण्यास ३ महीने कालावधी लागतो म्हणुन आधीच तयार करुन ठेवावा.
यात सप्तधान्य मोड आलेले पण टाकु शकता.
काही पिकांना ससे बाल्यवस्थेत खातात, गारबेज फवारणी केल्यास आंबट गोड वासाने खात नाही तेथुन पळ काढतात.
याच्या वासाने मधमाश्या मुंगळे आकर्षित होऊन परागिकरण होऊन उत्पादन वाढते.
कांद्यावर फवारणी व जमीनीतुन दिले असता थ्रीप्स नष्ट होऊन कांद्याची पात गुडघ्याच्या वर वाढली म्हणजेच उत्पादन वाढ.
फळपोषणाच्या काळात फवारणी केल्यास फळे मोठी वजनदार तयार होतात तडकणे वगैरा समस्या येत नाही.टोमॅटो फळ तडकणे गारबेज मुळे बंद होते.

very nice information
ReplyDelete